महाराष्ट्राचे माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं निधन

WhatsApp Group

कोपरगाव – महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा साईबाबा शिर्डी संस्थांनचे माजी उपाध्यक्ष शंकरराव गेनुजी कोल्हे यांचं वयाच्या ९३ व्या वर्षी बुधवारी (दि.१६ ) पहाटे ४.३० वाजता नाशिक येथे वृद्धापकाळाने निधन झालं आहे.

कोल्हे यांचा जन्म कोपरगाव तालुक्यामधील येसगाव येथे २४ मार्च १९२९ रोजी झाला होता. येसगावचे सरपंच ते राज्याचे मंत्री या प्रवासामध्ये त्यांनी राजकीय, शैक्षणिक, सहकार, उद्योग, शेती या क्षेत्रात अनेक पदावर यशस्वी रित्या काम केलं आहे.

१९७२मध्ये ते प्रथम अपक्ष म्हणून विधानसभेवर निवडून गेले होते. ते कोपरगाव विधानसभा मतदार संघातून सहा वेळा विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून गेले होते. त्यांनी महसूल, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क, कमाल जमीन धारणा या खात्याचे मंत्री म्हणून यशस्वीरित्या काम पहिले आहे. तसेच जागतिक दर्जाचे धार्मिक स्थळ असलेल्या श्री. साईंबाबा शिर्डी संस्थांनचे ते ९ वर्ष उपाध्यक्ष होते.