माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी!
मुंबई – मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने 2 नोव्हेंबर रोजी अटक केलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने दोन आठवड्यांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ईडीला न्यायालयाकडे देशमुख यांच्या कोठडीत नऊ दिवसांची मुदतवाढ मागितली होती, मात्र ती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी अटक करण्यात आली होती . सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) ने नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे देशमुख यांच्या विरोधात 100 कोटी वसूली प्रकरणाचा तपास सुरू आहे.
महाराष्ट्र के पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख को स्पेशल पीएमएलए कोर्ट ने 14 दिन की न्यायिक हिरासत में भेजा; मनी लॉन्ड्रिंग मामले में 1 नवंबर को हुई थी गिरफ़्तारी#AnilDeshmukh pic.twitter.com/mQpGG8Olbi
— डीडी न्यूज़ (@DDNewsHindi) November 6, 2021
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर सीबीआयने एफआयआर नोंदवला, ज्यात म्हटलं आहे की देशमुख यांनी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना मुंबईतील हॉटेल्स आणि बारमधून दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याचे निर्देश दिले होते.
दरम्यान, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी वाझे यांना शनिवारी 13 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 23 जुलै रोजी वाझे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मे 2021 मध्ये त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले.
देशमुख यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले होते, परंतु सीबीआयने गुन्हा नोंदवल्यानंतर एप्रिलमध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.