भारताचा ‘सिक्सर किंग’ युवराज सिंगला अटक..!
नवी दिल्ली – भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंगला (Yuvraj Singh) हरियाणा पोलिसांनी अनुसूचित जातींबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल अटक केली होती. मात्र, काही काळानंतर त्यांची अंतरिम जामिनावर सुटकाही झाली.
युवराज सिंगने गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान क्रिकेटपटू रोहित शर्मासोबत इंस्टाग्रामवर लाईव्ह चाट केले होते. या दरम्यान युवीने यजुवेंद्र चहलसाठी आक्षेपार्ह शब्द वापरला होता. यामुळे युवराजविरोधात SC/ST कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी सुरुवातीला युवराज सिंगच्या अटकेचे प्रकरण गुप्त ठेवले होते. त्याला हरियाणाच्या हांसी पोलिसांनी शनिवारी अटक केली. यानंतर रविवारी रात्री उशिरा त्याच्या अटकेची माहिती बाहेर आली. पोलिसांनी युवराजची हिसार येथील पोलीस विभागाच्या मेसमध्ये चौकशी केली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार युवराज सिंगची औपचारिक जामिनावर सुटका करण्यात आली.
आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्यानंतर युवराज सिंगने याबद्दल खेद व्यक्त करत माफीही मागितली होती. या साठी त्याने ट्विटरवर एक भली मोठी पोस्टही लिहीली होती.
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) June 5, 2020
युवीविरोधात तक्रार करणाऱ्या रजत कलसनने युवराज सिंगवर हरियाणा पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप केला आहे. रजत म्हणाला की, आम्ही युवराज सिंगला अंतरिम जामीन देण्याच्या पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. पुढील सुनावणी न्यायालयात होईल.
जून 2020 मध्ये रजत कलसन यांनी हांसी पोलिसांकडे तक्रार दिली होती, त्यानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. हांसी पोलिस पीआरओ सुभाष कुमार यांनी सांगितले की, युवराज सिंगला शनिवारी अटक करण्यात आली होती व डीएसपी विनोद शंकर यांनी युवराजची चौकशी केली होती. युवराज सिंगची चौकशी झाल्यानंतर तो चंदीगडकडे रवाना झाला