माजी आरोग्यमंत्री कार अपघातात गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

WhatsApp Group

महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या कारला डंपरने जोरदार धडक दिली. सध्या सावंत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दीपक सावंत आज सकाळी पालघरला रवाना झाले होते. त्याचवेळी काशिमीरा परिसरात एका डंपरने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे त्यांच्या वाहनाच्या मागील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. गंभीर जखमी झालेल्या सावंत यांच्या पाठीला व डोक्याला खूप दुखापत झाली आहे. सावंत यांना रुग्णवाहिकेतून अंधेरी येथील रुग्णालयात नेण्यात आले.

दीपक सावंत यांच्या गाडीला अपघात झाला तेव्हा रस्त्याने जाणाऱ्यांनी त्यांना मदत केली. रुग्णवाहिका बोलावून त्यांना उपचारासाठी अंधेरी येथे पाठवण्यात आले. या क्षणी कार अपघात प्रत्यक्षात कसा घडला? याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, मागून डंपरने धडक दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात लोकप्रतिनिधींच्या वाहनांच्या अपघाताच्या बातम्या समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार जयकुमार गोरे, योगेश कदम, बाळासाहेब थोरात यांच्या गाडीला अपघात झाला होता. हेही वाचा – साराच्या नावाने चिडवताचं गिलने दिली मजेशीर प्रतिक्रिया, VIDEO झाला व्हायरल

अशाच एका रस्ते अपघातात नेते विनायक मेटे यांचा मृत्यू झाला होता. वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही सर्वांनी रात्रीचा प्रवास टाळण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते. हेही वाचा – iPhone Offer: फक्त 12,200 रुपयांमध्ये iPhone खरेदी करण्याची संधी!