Breaking News: भाजपला मोठा धक्का, माजी आमदार रोहिता रेवडी यांनी धरला काँग्रेसचा हात

0
WhatsApp Group

हरियाणात भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार रोहिता रेवडी (Rohita Revadi) यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी भूपेंद्र सिंह हुडा आणि चौधरी उदयभान यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रोहिता रेवडी या पंजाब खत्री समाजाच्या मोठ्या नेत्या आहेत. त्यामुळे कर्नाल लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा फायदा होणार आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर रोहिता रेवडी म्हणाल्या की, लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकित काँग्रेसचा विजय निश्चित आहे. गेल्या दीड वर्षात ४० हून अधिक खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.

रोहिता रेवडी २०१४ साली भाजपच्या तिकीटावर पानिपत शहरी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट रद्द करण्यात आले होते. प्रमोद विज यांना येथून तिकीट देण्यात आले होते.