भाजपच्या माजी नगराध्यक्षांच्या सुनेची गळफास घेऊन आत्महत्या; समोर आलं हे धक्कादायक कारण

WhatsApp Group

पुणे : आळंदी नगर परिषदेच्या भाजपच्या माजी नगर अध्यक्षा वैजयंता उमरगेकर-कांबळे यांच्या सुनेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुनेने केलेल्या आत्महत्या प्रकरणी आळंदी नगर परिषदेच्या भाजपच्या माजी नगर अध्यक्षा वैजयंता उमरगेकर-कांबळे त्यांचे पती अशोक उमरगेकर आणि मुलगा अभिषेक विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून तिघांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

हुंड्यात ठरलेल्या वस्तू दिल्या नाहीत म्हणून छळ करत आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनेत गळफास घेऊन मयत झालेल्या तरुणीचे नाव प्रियंका घोलप असं आहे, प्रियांका ह्या पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या माजी नगर सेविका कमल घोलप यांची मुलगी आहे. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.