Viral Video: किंग खानच्या ‘मन्नत’बाहेर ‘छम्मक छल्लो’चा धमाका! परदेशी तरुणाचे डान्स मूव्ह्स पाहून नेटकरी फिदा; व्हिडिओ तुफान व्हायरल

WhatsApp Group

मुंबई: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे वांद्रे येथील ‘मन्नत’ हे घर नेहमीच चाहत्यांच्या गर्दीने गजबजलेले असते. मात्र, सध्या मन्नतच्या गेटबाहेर एका परदेशी तरुणाने केलेल्या भन्नाट डान्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जॅकरी जेरेमिया (Zachary Jeremiah) याने शाहरुखच्या गाजलेल्या ‘छम्मक छल्लो’ गाण्यावर असा काही डान्स केला की, तिथे उपस्थित असलेली गर्दी पाहतच राहिली. या डान्सचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर आगीसारखा पसरला आहे.

एंग्झायटीवर मात करत ‘मन्नत’ जिंकलं

जॅकरीच्या या व्हिडिओची एक विशेष पार्श्वभूमी आहे. आदल्या दिवशी याच ठिकाणी जॅकरी डान्स करण्यासाठी आला होता, पण तिथे असलेली तुफान गर्दी पाहून तो घाबरला आणि डान्स न करताच निघून गेला होता. मात्र, जिद्द न हारता दुसऱ्या दिवशी तो पुन्हा आला आणि पूर्ण आत्मविश्वासाने त्याने डान्स केला. त्याची ही ‘बाऊन्स बॅक’ स्टोरी नेटकऱ्यांना खूप भावली आहे. सोशल एंग्झायटीवर मात करून त्याने ज्या उत्साहात डान्स केला, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

७ लाखांहून अधिक व्ह्यूज

हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही तासांतच तो ७.५ लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वांद्रेच्या रस्त्यावर जॅकरीला नाचताना पाहून येणारे-जाणारे प्रवासी आणि शाहरुखचे चाहते थबकले. अनेकांनी आपले फोन काढून त्याचे रेकॉर्डिंग सुरू केले. जॅकरीच्या स्टेप्स आणि त्याचा वाखाणण्याजोगा आत्मविश्वास पाहून नेटिझन्स त्याच्यावर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

शाहरुखचा जगभर क्रेझ

बॉलिवूड गाण्यांची आणि विशेषतः शाहरुख खानची जादू केवळ भारतापुरती मर्यादित नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जॅकरीच्या या व्हिडिओप्रमाणेच, काही दिवसांपूर्वी एका चिनी नागरिकाचा ‘मोहब्बतें’ चित्रपटातील गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. जगभरातील शाहरुखचे चाहते ‘मन्नत’ला भेट देण्यासाठी येतात आणि अशा प्रकारे आपले प्रेम व्यक्त करतात.