
Maharashtra Corona: राज्यातील (Maharashtra Corona) कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णवाढीचा आलेख चढताच आहे. सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच आज, शुक्रवारी 1000 हून जास्त कोरोनाबाधित रुग्ण (Corona Patients in Mumbai) आढळून आले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात 1134 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 563 रुग्ण बरे झाले आहेत.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. सलग तिसऱ्या दिवशी मुंबईत मोठी आकडेवारी समोर आली आहे. मुंबईत, शुक्रवारी 763 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली. मुंबईचा पॉझिटीव्हीटी रेट 7 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर ठाणे मनपा 77, नवी मुंबई 71, पुण्यात 72 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मुंबईमध्ये आहे. मुंबईत सध्या 3735 रुग्ण आहेत. राज्याच्या 60 टक्के सक्रीय रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. त्या खालोखाल ठाण्यात 658, रायगडमध्ये 108 आणि पुण्यात 409 सक्रीय रुग्ण आहेत.