
तिरुअनंतपुरम – केरळमधील कल्लंबलमजवळ शनिवारी सकाळी एकाच कुटुंबातील पाच सदस्य त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. पोलिसांकडून सांगण्यात आले की, घराचा मालक एका खोलीत गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळला तर इतर चार सदस्य जमिनीवर पडलेले आढळले. त्यांनी विष प्राशन केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.