मेळघाट येथे दूषित पाण्याने मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये पाचडोंगरी आणि कोयलारी गावात विहिरीतील दूषित पाणी पिण्याने मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले आहे.
#अमरावती जिल्ह्यातील पाचडोंगरी व कोयलारी गावात दूषित पाणी पिण्याने मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी घोषित केले आहे. आजारी पडलेल्यांना शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार देण्याचेही निर्देश. pic.twitter.com/Q7EV4D1nEy
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 9, 2022
याशिवाय हे दूषित पाणी पिऊन आजारी पडलेल्याना शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार देण्याचे देखील त्यांनी निर्देश दिले आहेत