राज्याच्या मुख्य सचिवपदी पहिल्यांदाच महिला अधिकारी; कोण आहेत सुजाता सौनिक?

WhatsApp Group

महाराष्ट्रात प्रथमच एका महिला आयएएस अधिकाऱ्याला मुख्य सचिव बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. सुजाता सौनिक असे या महिला आयएएस अधिकारी असून त्या मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांची जागा घेतील. सुजाता सौनिक यांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. जाणून घेऊया कोण आहेत सुजाता सौनिक?

कोण आहेत सुजाता सौनिक?

सुजाता सौनिक या 1987 च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्या राज्याच्या गृहविभागात अतिरिक्त मुख्य सचिव होत्या. अलीकडेच कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने त्यांना सचिवपदी बढती दिली होती. त्यांनी सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही काम केले आहे. सार्वजनिक आरोग्यासह अनेक विभागात काम करण्याचा त्यांना अनुभव आहे.

सुजाता सौनिक यांना प्रशासकीय सेवेत काम करण्याचा तीन दशकांपासूनचा अनुभव आहे. त्यांना आरोग्य सेवा, वित्त, शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध विभागांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. सुजाता यांचे पती मनोज सौनिक हे देखील राज्याचे मुख्य सचिव होते. यानंतर त्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सल्लागार म्हणून करण्यात आली होती.