जगातील सर्वात प्रसिद्ध T20 लीग अशी ओळख असलेल्या आयपीएलला 2008 सुरुवात झाली होती. या स्पर्धेच्या इतिहासातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला होता. या पहिल्याच सामन्यापासून या स्पर्धेचा थरार प्रेक्षकांच्या डोक्यात गेला आणि आज या स्पर्धेच्या 15 व्या हंगामापर्यंत तो तसाच कायम आहे.
18 एप्रिल 2008 ला खेळण्यात आलेल्या या पहिल्या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 3 गडी गमावून 222 धावा केल्या. कोलकाताकडून ब्रेंडन मॅक्युलमने 73 चेंडूत 13 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने 158 धावांची स्फोटक खेळी खेळली. कोलकात्याने दिलेल्या 223 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीचा संघ अवघ्या 82 धावांत गारद झाला. केकेआरसाठी अजित आगरकरने शानदार स्पेल टाकला आणि 25 धावांत 3 बळी घेतले. मॅक्क्युलमला त्याच्या उत्कृष्ट खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
झहीर खाने घेतला होता आयपीएलमधील पहिला विकेट – आयपीएलच्या पहिल्या-वहिल्या सत्रातील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून Royal Challengers Bangalore खेळताना झहीर खानने Zaheer khan कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार सौरव गांगुलीला बाद केले होते.