WPL 2024 FULL Schedule: महिला प्रीमियर लीग (WPL) च्या दुसऱ्या सत्राच्या वेळापत्रकाची सर्व चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आगामी हंगामातील पहिला सामना 23 फेब्रुवारी रोजी पहिल्या सत्रातील विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. या वेळी स्पर्धेचे सामने 2 वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळवले जातील.
दुसऱ्या सत्राचा अंतिम सामना या तारखेला
क्रिकबझच्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, या मोसमातील दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि यूपी वॉरियर्स यांच्यात होणार आहे. दुसऱ्या सत्राचा अंतिम सामना 17 मार्च रोजी खेळवला जाईल, तर एलिमिनेटर सामना 15 मार्च रोजी खेळला जाईल, ज्यामध्ये दोन्ही सामने फक्त दिल्लीत खेळले जातील. 5 संघांच्या या स्पर्धेत अंतिम सामन्यासह एकूण 22 सामने खेळले जातील, ज्यामध्ये बेंगळुरू आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी 11-11 सामने खेळले जातील. यामध्ये 23 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत बेंगळुरू येथे सामने होणार असून संपूर्ण स्पर्धा 24 दिवस खेळवली जाणार आहे. यावेळी महिला प्रीमियर लीगचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होतील.
🚨 #WPL2024 to begin with an #MIvDC clash at the Chinnaswamy Stadium on February 23. @vijaymirror has more https://t.co/MaNIzcqYTK pic.twitter.com/Sa3EvzzXw3
— Cricbuzz (@cricbuzz) January 23, 2024
दुसऱ्या सत्राचे संपूर्ण वेळापत्रक येथे पहा
- 23 फेब्रुवारी – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, (बेंगळुरू, एम. चिन्नास्वामी स्टेडियम)
- 24 फेब्रुवारी – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध यूपी वॉरियर्स, (बेंगळुरू, एम. चिन्नास्वामी स्टेडियम)
- 25 फेब्रुवारी – गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, (बेंगळुरू, एम. चिन्नास्वामी स्टेडियम)
- 26 फेब्रुवारी – यूपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, (बेंगळुरू, एम. चिन्नास्वामी स्टेडियम)
- 27 फेब्रुवारी – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात जायंट्स (बेंगळुरू, एम. चिन्नास्वामी स्टेडियम)
- 28 फेब्रुवारी – मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स, (बेंगळुरू, एम. चिन्नास्वामी स्टेडियम)
- 29 फेब्रुवारी – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, (बेंगळुरू, एम. चिन्नास्वामी स्टेडियम)
- 1 मार्च – यूपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स, (बेंगळुरू, एम. चिन्नास्वामी स्टेडियम)
- 2 मार्च – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स, (बेंगळुरू, एम. चिन्नास्वामी स्टेडियम)
- 3 मार्च – गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, (बेंगळुरू, एम. चिन्नास्वामी स्टेडियम)
- 4 मार्च – यूपी वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, (बेंगळुरू, एम. चिन्नास्वामी स्टेडियम)
- 5 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, (दिल्ली, अरुण जेटली स्टेडियम)
- 6 मार्च – गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, (दिल्ली, अरुण जेटली स्टेडियम)
- 7 मार्च – यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, (दिल्ली, अरुण जेटली स्टेडियम)
- 8 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्स, (दिल्ली, अरुण जेटली स्टेडियम)
- 9 मार्च – मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स, (दिल्ली, अरुण जेटली स्टेडियम)
- 10 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, (दिल्ली, अरुण जेटली स्टेडियम)
- 11 मार्च – गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स, (दिल्ली, अरुण जेटली स्टेडियम)
- 12 मार्च – मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, (दिल्ली, अरुण जेटली स्टेडियम)
- 13 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स, (दिल्ली, अरुण जेटली स्टेडियम)
- 15 मार्च – एलिमिनेटर
- 17 मार्च – अंतिम सामना