पालघरजवळ जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार, 4 जणांचा जागीच मृत्यू

0
WhatsApp Group

पालघरमधून चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनवर झालेल्या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ही ट्रेन गुजरातहून मुंबईकडे येत होती. ही घटना सोमवारी पहाटे 5 वाजताची असल्याची माहिती आहे. वापी आणि सुरत स्थानकादरम्यान ही घटना घडली. आरपीएफ कॉन्स्टेबलने त्याच्या एएसआयवर गोळीबार केला. त्यानंतर गोळी आणखी तीन प्रवाशांना लागली. पोलिसांनी आरपीएफ कॉन्स्टेबलला बंदुकीसह अटक केली आहे.

30 वर्षीय चेतन सिंग असे आरपीएफ कॉन्स्टेबलचे नाव आहे. घटनास्थळी जीआरपी पोलीस आणि आरपीएफ पोलीस हजर आहेत. सोमवारी पहाटे 5.23 वाजता जयपूर-मुंबई एक्स्प्रेस (12956) ट्रेनच्या बी5 डब्यात गोळीबार झाला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. आरपीएफ कॉन्स्टेबलने गोळीबार का केला हे अद्याप समजू शकलेले नाही.

गोळीबारानंतर कॉन्स्टेबलने ट्रेनमधून उडी मारली

“पालघर स्टेशन ओलांडल्यानंतर एका आरपीएफ कॉन्स्टेबलने चालत्या जयपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोळीबार केला. त्याने आरपीएफ एएसआय आणि इतर तीन प्रवाशांना गोळ्या घातल्या. त्यानंतर तो दहिसर स्टेशनजवळ ट्रेनमधून उडी मारली,” पश्चिम रेल्वेने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे. आपला जीव गमावलेल्या ए.एस.आय

ही ट्रेन जयपूर जंक्शनवरून 02:00 वाजता सुटते आणि 06:55 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचते. दुर्घटनेत प्राण गमावलेल्या एएसआयचे नाव टिळक राम आहे.

ट्रेनमध्ये दोन जवानांमध्ये हाणामारी 

ट्रेनमध्ये चेतन आणि तिलक राम या दोन जवानांमध्ये भांडण झाल्याचं सांगण्यात येत आहे. वरिष्ठांशी झालेल्या भांडणानंतर चेतनने गोळीबार केला. गोळीबारामुळे ट्रेनमध्ये गोंधळ उडाला असून काही प्रवासी ट्रेनमधून उडी मारल्याने जखमी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतनची बदली झाल्यामुळे तो संतापला होता. यासोबतच तो कौटुंबिक तणावातही होता. मृतांचे मृतदेह बोरिवलीत उतरवण्यात आले असून ट्रेन पुढे रवाना करण्यात आली आहे.