मृत्युशी झुंज ठरली अपयशी, जवान सदाशिव कर्वे यांचे मुंबईत निधन!

WhatsApp Group

मुंबई – माटुंगा पूर्वेकडील एका इमारतीत मॉकड्रील घेताना झालेल्या अपघातात अग्निशमन दलाचे जवान सदाशिव कर्वे गंभीर जखमी झाले होते. गेले ६ दिवस ते मृत्युशी झुंज देत होते मात्र आज त्यांची मृत्युशी असलेली झुंज संपली असून त्यांचे निधन झाले आहे.


सदाशिव कर्वे यांच्या निधनानंतर मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी प्रमुख अग्निशमन अधिकारी श्री. हेमंत परब तसेच अग्निशमन दलाचे संबंधित अधिकारीही उपस्थित होते.

अग्निशमन विभागाच्या मुंबईतील मुख्यालयात आज सकाळी जवान सदाशिव कर्वे यांना मानवंदना देण्यात आली आहे. त्यांच्यावरील अंत्यसंस्कार हे त्याच्या गावी सातारा येथे करण्यात येणार आहेत.