सध्या भारतात एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिला आहे. बुधवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारताचा उपांत्य सामना न्यूझीलंडशी होणार आहे. मात्र, या उपांत्य फेरीपूर्वीच मुंबई पोलिसांना काही मोठी घटना घडवून आणण्याची धमकी मिळाली आहे. या हायप्रोफाईल कार्यक्रमासंदर्भात धमकी मिळताच मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान काही मोठी घटना घडवून आणण्याची धमकी मुंबई पोलिसांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X च्या माध्यमातून एका अज्ञात व्यक्तीकडून मिळाली आहे. धमकी देणार्या व्यक्तीने ट्विटरवर मुंबई पोलिसांना टॅग केले ज्यात एका फोटोमध्ये बंदूक, हँडग्रेनेड आणि गोळ्या देखील दिसत आहेत.
#WATCH मुंबई: आज मुंबई के वानखेड़े स्टेडियम में होने वाले भारत बनाम न्यूजीलैंड सेमीफाइनल मैच से पहले सुरक्षा व्यवस्था पर सत्य नारायण चौधरी, ज्वाइंट सीपी, लॉ एंड ऑर्डर ने बताया, “आज सेमीफाइनल मैच के लिए पर्याप्त सुरक्षा व्यवस्था के इंतजाम किए गए हैं। लगभग 7 DCPs, 200 पुलिस अधिकारी… pic.twitter.com/z8c0CR4u93
— ANI_HindiNews (@AHindinews) November 15, 2023
पोलिसांकडून कडक बंदोबस्त
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्याला हजारो प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत. याशिवाय या सामन्याबाबत बरीच उत्सुकता असणार आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी वानखेडे स्टेडियम आणि आजूबाजूच्या परिसरात करडी नजर ठेवली आहे. एका अनोळखी व्यक्तीने त्याच्या ट्विटमध्ये एक फोटो देखील पोस्ट केला होता ज्यामध्ये मॅच दरम्यान आग लावणार असल्याचा संदेश दिला.
भारतीय संघ एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकण्यापासून फक्त दोन पावले दूर आहे. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाचा सामना न्यूझीलंड संघाशी होणार आहे. हा सामना आज 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजल्यापासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या संपूर्ण विश्वचषकात भारतीय संघ अपराजित राहिला आहे. त्यामुळे संघाचे मनोबल खूप उंचावले आहे.