Delhi Fire: प्लास्टिक कारखान्याला भीषण आग, काचा फोडून लोकांना बाहेर काढले; 2 जणांचा मृत्यू

WhatsApp Group

दिल्लीतील नरेला भागात एका प्लास्टिक कारखान्याला भीषण आग लागली. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. इमारतीच्या काचा फोडून लोकांना बाहेर काढले जात आहे. या अपघातात आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दिल्ली अग्निशमन सेवेने सांगितले की, नरेला इंडस्ट्रियल एरियातील एका प्लास्टिक कारखान्याला आग लागली. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत तीन जणांना वाचवण्यात यश आले असून काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बचावकार्य सुरू आहे.नरेला येथील कारखान्यात कामगार काम करत असताना ही आग लागली. इमारतीत 2-3 लोक अडकले असण्याची भीती आहे. त्यांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आगीची घटना नरेला औद्योगिक परिसरात घडली. काही लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, त्यांची ओळख पटवली जात आहे.