मुंबईत इमारतीच्या 18व्या मजल्यावर भीषण आग, 7 जणांचा मृत्यू तर 15 हून अधिक जखमी

WhatsApp Group

मुंबईतील ताडदेव परिसरात एका 20 मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. कमला बिल्डिंगच्या 18व्या मजल्यावर आग लागली. या आगीत अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले तर 15 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे kamala building fire.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. सध्या अग्निशमन दलाच्या 13 गाड्या घटनास्थळी हजर आहेत. इमारतीत अडकलेल्या बहुतांश लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.


बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी 5 रुग्णवाहिका हजर आहेत.

विशेष म्हणजे अपघाताची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरही घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनीही रुग्णालयात पोहोचून जखमींची प्रकृती जाणून घेतली. इमारतीला जवळपास सर्व लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे.