मुंबई – कांजूरमार्ग परिसरात गवताच्या मैदानात आग लागल्याची घटना समोर आली आहे. येथील कांजूरमार्ग मेट्रो कार डेपोमध्ये असलेल्या सुक्या गवताला भीषण आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही fire breaks out in the grassland in Kanjurmarg.
आगीतून निघणारा धूर अनेक किलोमीटर दूरवरून दिसत आहे. ही आग कोरड्या जागेत लागल्यामुळे ती वेगाने पसरली. त्याचबरोबर आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. आग विझवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
#WATCH | A major fire breaks out in the grassland in Kanjurmarg area of Mumbai, Maharashtra pic.twitter.com/bjS59zzCVs
— ANI (@ANI) January 31, 2022
अग्निशमन दलाच्या म्हणण्यानुसार ही लेव्हल २ची आग असून ती विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
कांजूरमार्ग परिसरात मेट्रो कारशेड बांधण्यात येत असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्य ठेवण्यात आले आहे. ही आग लागली तर मोठी दुर्घटना घडू शकते असं अग्निशमन दलाने सांगितलं आहे.
Major fire breaks out near #Kanjurmarg. #Mumbai #Mulund #Bhandup pic.twitter.com/xy6FxOUm2M
— Pranshu Dubey (@Pranshu14) January 31, 2022