पेंट फॅक्टरीला भीषण आग, जणांचा होरपळून मृत्यू; भयानक व्हिडिओ समोर आला

WhatsApp Group

दिल्लीतील अलीपूर येथील पेंट फॅक्टरीत गुरुवारी भीषण आग लागली. आगीत होरपळून तीन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 22 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. घटनास्थळावरून व्हिडिओ समोर आले आहेत. अनेक किलोमीटरपर्यंत धुराचे लोट दिसत आहेत.

दयालपूर अलीपूर येथील एच ब्लॉकमधील एका कारखान्याला आग लागल्याची बातमी गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अग्निशमन दलाला मिळाली. सुरुवातीला अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या होत्या मात्र आग अधिक पसरल्याने अग्निशमन दलाच्या 22 गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ जवळची घरे रिकामी करून इतर घरांच्या छतावर चढून आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुमारे दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.

22 कार आणि पाच दुकानांना आग लागली: आगीचे लोळ आणि धूर पाहून परिसरातील नागरिक घाबरले. आगीचे लोट आणि धुराचे लोट काही किलोमीटर अंतरावरून दिसत होते. हवेत उडालेल्या ज्वाळा पाहून मालाचे मोठे नुकसान झाले असावे असा अंदाज बांधला जात आहे. या आगीत 22 कार आणि पाच दुकाने जळून खाक झाली. आगीच्या कारणाचा पोलीस तपास करत आहेत.