छत्रपती संभाजीनगर येथे आग लागल्याची घटना समोर आली आहे. रविवारी पहाटे हातमोजे बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग लागली. या आगीत 6 जणांचा मृत्यू झाला. आगीत भाजल्यामुळे या लोकांचा मृत्यू झाला. कारखान्याला आग लागल्यानंतर त्यात लोक अडकल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि मदतकार्य सुरू केले. आग आता आटोक्यात आली आहे.
जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील हातमोजे तयार करणाऱ्या कंपनीत भीषण आग लागली. स्थानिकांनी सांगितले की, “छत्रपती संभाजी नगर येथील वाळूज एमआयडीसी भागातील रिअल सनशाईन कंपनीला भीषण आग लागली असून पाच कर्मचारी आत अडकले आहेत.” त्याचबरोबर 6 जण भाजल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमींना छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन ते तीन गाड्यांना कसरत करावी लागली. घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलीस उपस्थित होते. सध्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले आहे. ही कंपनी कापसाचे हातमोजे तयार करते असे सांगितले जात आहे.
टीम इंडियाला मोठा धक्का, दुसऱ्या कसोटीपूर्वी ‘हा’ स्टार खेळाडू जखमी
#WATCH | Maharashtra: Morning visuals from the hand gloves manufacturing factory in Waluj MIDC area in Chhatrapati Sambhajinagar where six people died after a fire broke out late at night. https://t.co/gPCXt18L5U pic.twitter.com/WHk8Qt7Z1k
— ANI (@ANI) December 31, 2023
आगीच्या घटनेनंतर लगेचच कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, पाच कर्मचारी कारखान्यात अडकले आहेत. भुल्ला शेख (65), कौसर शेख (26), इक्बाल शेख (26) आणि मगरूफ शेख (25) अशी अडकलेल्या चार कामगारांची स्थानिकांनी ओळख पटवली आहे. कामगारांनी सांगितले की, कंपनी रात्री बंद होती आणि आग लागली तेव्हा ते झोपले होते. “आग लागली तेव्हा इमारतीत 10-15 लोक होते. काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले, पण काही अजूनही आत अडकले होते,” असे तो कर्मचारी म्हणाला.
मुंबई ते अयोध्या रेल्वे सुरू व्हावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विनंती
Fire breaks out at glove factory in Maharashtra, five trapped inside
Read @ANI Story | https://t.co/cTlMtoQa9r#Fire #Maharashtra #GloveFactory pic.twitter.com/PH7gTKZ8bZ
— ANI Digital (@ani_digital) December 30, 2023