भारतातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा! गुजरातच्या ‘या’ कंपनीकडून 28 बँकांची 22842 कोटी रुपयांची फसवणूक!

WhatsApp Group

नवी दिल्ली – नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या बँक घोटाळ्यापेक्षाही मोठा बँकिंग घोटाळा उघडकीस आला आहे. गुजरातमधील एका कंपनीनेही हा घोटाळा केला आहे. गुजरातमधील एबीजी ABG शिपयार्ड कंपनीने देशातील 28 बँकांची 22,842 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी 14 हजार कोटींचा घोटाळा केला होता. एबीजी शिपयार्ड घोटाळा हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा बँकिंग घोटाळा मानला जात आहे ABG Shipyard BANK fraud.

CBI म्हणते की ABG शिपयार्ड आणि त्यांचे संचालक- ऋषी अग्रवाल, संथानम मुथुस्वामी आणि अश्विनी अग्रवाल यांनी बँकांची 23,000 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. एबीजी शिपयार्ड आणि तिची प्रमुख कंपनी जहाजे बांधणे आणि दुरुस्त करण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे. गुजरातमधील दहेज आणि सुरत येथे यांचे शिपयार्ड आहेत.

SBI ने सर्वप्रथम 8 नोव्हेंबर 2019 रोजी तक्रार दाखल केली होती, ज्यावर CBI ने 12 मार्च 2020 रोजी काही स्पष्टीकरण मागितले होते. गेले अनेक महिने या प्रकरणाचा तपास केल्यानंतर एफआयआर दाखल केली आहे.

नुकतीच स्टेट बँक ऑफ इंडियाने या प्रकरणाची सीबीआयकडे तक्रार केली होती. कंपनीने त्याच्याकडून 2,925 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे तक्रार पत्रात म्हटले आहे. कंपनीने देशातील सर्वात मोठी खाजगी बँक ICICI कडून सर्वाधिक 7,089 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. IDBI कडून 3,634 कोटी रुपये, बँक ऑफ बडोदाकडून 1,614 कोटी रुपये, पंजाब नॅशनल बँकेकडून 1,244 कोटी रुपये आणि इंडियन ओव्हरसीज बँकेकडून 1,228 कोटी रुपये थकीत आहेत. हा संपूर्ण घोटाळा एप्रिल 2012 ते जुलै 2017 या कालावधीतील आहे

हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी पंजाब नॅशनल बँकेसोबत 14 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण खूप गाजले होते. नीरव मोदी सध्या ब्रिटनमध्ये आहेत. त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याआधीही मद्य व्यावसायिक विजय मल्ल्यावरील सुमारे नऊ हजार कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीचे प्रकरणही चर्चेत होते.

हेही वाचा

 ‘पुष्पा’ फेम रश्मिका ठरली Oops मोमेंटची शिकार! फोटो होतोय व्हायरल

24 तासांत 919 पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवत लिसा स्पार्कने रचला विचित्र विक्रम

मुंबई महापालिकेत उंदीर घोटाळा? शहरातील उंदीर मारण्यासाठी तब्बल 1 कोटींचा खर्च