शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राविरुद्ध मुंबईत एफआयआर, 1.51 कोटींच्या फसवणुकीचा आरोप

WhatsApp Group

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणी थांबताना दिसत नाहीये. पॉर्न व्हिडिओ प्रकरणात अडकल्यानंतर राज कुंद्रा आता फसवणुकीच्या प्रकरणात अडकताना दिसत आहे. मुंबईतील वांद्रे पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

नितीन बाराई नावाच्या व्यक्तीने शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरोधात फसवणुकीच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केली आहे. नितीन बाराई यांनी तक्रार दाखल करून शिल्पा आणि राज यांच्यावर १.५१ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी 2014-2015 मध्ये फिटनेस कंपनीच्या माध्यमातून 1.51 कोटींची फसवणूक केल्याचे बाराई याचे म्हणणे आहे.

शिल्पा आणि राज कुंद्रावर दाखल करण्यात आलेत हे गुन्हे

नितीन बाराई यांच्या तक्रारींनंतर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर मुंबईतील वांद्रे पोलिसांनी आयपीसीच्या कलम 406, 409, 420, 506, 34 आणि 120 (बी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरू करणार आहेत. पैशांच्या फसवणुकीप्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची चौकशी होऊ शकते.

राज कुंद्रा पॉर्न व्हिडिओ बनवून अपलोड केल्याप्रकरणी अनेक दिवसांपासून तुरुंगात आहे. राज कुंद्राची सध्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राज यांनी मीडियापासून अंतर राखले. त्याने त्याचे सोशल मीडिया अकाउंटही डिलीट केले. राज आणि शिल्पाचे आयुष्य हळूहळू रुळावर येऊ लागले. दोघेही नुकतेच एकत्र मंदिरात जाताना दिसले. मात्र आता पुन्हा एकदा शिल्पा आणि राजच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.