Optical Illusion: स्वत:ला चॅम्पियन म्हणण्याआधी फोटोमधला पोपट शोधा; पाहू तरी तुमची नजर किती तीक्ष्ण आहे

WhatsApp Group

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून Optical Illusion संदर्भातले बरेच फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये दडलेल्या प्रत्येक रहस्याला शोधण्यासाठी सर्वजण नानाविध वाटा अवलंबताना दिसत आहेत. बरं, हे फोटो निरखून पाहण्यासाठी बराच वेळही घालवत आहेत. असाच आणखी एक फोटो तुमच्या निरिक्षण क्षमतेला आता आव्हान देऊ पाहत आहे.

हे फोटो आणि त्यात दडलेल्या गोष्टी शोधणे तर माझं कसब आहे, असं म्हणत जर तुम्ही श्रेय घेत असाल तर आधी या फोटोमध्ये दडलेला पोपट शोधून दाखवण्याचे धाडस करा.

स्वत:चा पोपट न होऊ देण्यासाठी अर्थात फजिती टाळण्यासाठी तुमच्याकडे फोटोमध्ये दडलेला पोपट शोधणे हा एकमेव पर्याय आहे.

जरा व्यवस्थित हा फोटो एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत पाहा. या हिरवळीमध्ये दडलेला पोपट तुम्हाला कुठे दिसतोय का? कोणत्या झा़डाच्या फांदीवर तो दिसतोय असं तुमच्या लक्षात येतंय का? हार मानून चालणार नाही, तुम्ही उत्तराच्या जवळट आहात नीट पाहा.

दिसला ? फोटोकडे व्यस्थित पाहा. इथं डाव्या बाजूला एका फांदीवर पोपट असल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्याचा आणि पानांचा रंग इतका एकसारखा आहे, की तो तिथं आहे हे समजतच नाही. तुम्हाला तर या फोटोमध्ये पक्षी दिसला, आता हाच प्रश्न पाहा तुमच्या मित्रमंडळींना विचारून पाहा.