आधार कार्ड हे आजचे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. प्रत्येक लहानमोठ्या कामामध्ये याची गरज असते आणि त्यामुळे त्यात केलेली छोटीशी चूक तुमचे मोठे नुकसान करू शकते. आधार कार्डमध्ये काही चूक झाली असेल तर तुम्ही ती दुरुस्त करू शकता. यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, जन्मतारीख आणि पत्ता बदलण्याची सुविधा मिळते.
नाव किती वेळा बदलता येईल?
आधार कार्डमधील नाव चुकीचे असल्यास, UIDAI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, वापरकर्ता त्याचे नाव फक्त एकदाच बदलू शकतो.
जन्मतारीख किती वेळा बदलता येईल?
डेटा एंट्री करताना चुकून तुमची जन्मतारीख आधार कार्डमध्ये चुकली असेल तर तुम्ही ती एकदाच बदलू शकता. याशिवाय आधार कार्डमध्ये जन्मतारीख बदलण्याची तरतूद नाहीय.
पत्ता किती वेळा बदलता येतो?
आधार कार्डमधील पत्ता बदलण्यापूर्वी तुम्ही तो एकदा बदलू शकता हे लक्षात ठेवा.
घरबसल्या करू शकता अपडेट
आधार कार्डचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला कोणतेही बदल करण्यासाठी कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही. तर हे काम तुम्ही घरबसल्या इंटरनेटच्या माध्यमातून सहज करू शकता.