चुकीच्या शहर नियोजनामुळे होणाऱ्या वाहतुक कोंडीवर पर्याय म्हणून पुणे येथील चांदणी चौकातील पूल (Pune Chandni Chowk Bridge Update) अखेर पाडण्यात आला आहे. ल्या अनेक दिवसांपासून हा पूल पाडण्याची तयारी सुरु होती. रविवारी (2 ऑक्टोबर) रात्री 1 वाजून 7 मिनीटांनी हा पूल पाडण्यात आला.
#चांदणीचौक येथील जुना पूल पाडण्यासाठी नियंत्रित ब्लास्टचा उपयोग करण्यात आला.@NHAI_Official @MahaDGIPR pic.twitter.com/Xk6K9BoQa6
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) October 1, 2022
प्रशासनाने आगोदरच दिलेल्या माहितीनुसार, पुल पाडण्यासाठी स्फोटकांचा वापर करण्यात आला. पुल पडताच सर्व परिसरात धुळीचे लोट आकाशात उडाले होते. पुढचे काही मिनिटे धुळीचे लोट आकाशात दिसत होते. दरम्यान, धुळ खाली बसली असली तरी मातीचा ढिगारा अद्यापही जागेवरच आहे. तो हटविण्यासाठी काम प्रगतिपथावर आहे.
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा