अखेर ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महापालिकेने स्वीकारला

WhatsApp Group

शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये संघर्ष वाढला आहे. अंधेरी पोट निवडणूकीत या गटांमध्ये पहिल्यांदाच निवडणूकीच्या रिंगणात लढाई होणार आहे. दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या रिक्त जागेवर ठाकरे गटाकडून त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मागील काही दिवस ऋतुजा लटके (Rutuja Latke)  यांच्या उमेदवारीवरून अनेक चर्चा रंगत होत्या. राजीनामा मंजुरी प्रकरणात काल कोर्टाने ऋतुजा लटकेंना मोठा दिलासा दिला त्यानंतर आज अखेरीस ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महापालिकेने स्वीकारला आहे.