बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूने पहिल्यांदाच तिची मुलगी देवीचा चेहरा दाखवला आहे. बिपाशा बासू आणि तिचा पती करण सिंग ग्रोवर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून त्यांच्या छोट्या मुलीचे दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये देवी हसताना दिसत आहे. बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर 12 नोव्हेंबर 2022 रोजी एका मुलीचे पालक झाले. दोघांनीही अद्याप आपल्या मुलीचा चेहरा उघड केला नव्हता.
बिपाशा बासूने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर मुलीचा फोटो शेअर केला आहे. फोटोत बिताशाची मुलगी आनंदाने हसताना दिसत आहे. देवीने गुलाबी रंगाचा पोशाख घातला आहे ज्यामध्ये ती एका छोट्या देवदूतासारखी दिसत आहे. बिपाशाच्या या पोस्टवर बॉलिवूड सेलिब्रिटी, मित्र आणि चाहते खूप प्रेम करत आहेत आणि आशीर्वादही देत आहेत. फोटोमध्ये, देवी पेस्टल गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये डोक्यावर हेडबँड घालून हसत आहे.
View this post on Instagram
बिपाशा आणि करण सिंग ग्रोव्हरने 2016 मध्ये लग्न केले होते. दोघांच्या लग्नाला जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. बिपाशा आणि करण अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करतात. बिपाशा-करण यांची पहिली भेट ‘अलोन’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. चित्रपटगृहात जरी चित्रपट काही खास दाखवू शकला नसला तरी खऱ्या आयुष्यात या दोघांची जोडी नक्कीच हिट ठरली. चित्रपटाच्या सेटपासून सुरू झालेल्या मैत्रीचे कालांतराने प्रेमात रूपांतर झाले आणि दोघांनी लग्न केले. बिपाशा बसूच्या बॉलीवूड वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, तिचा शेवटचा चित्रपट देखील ‘अलोन’ होता.
Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा