Video : मुंबई येथील अंधेरी परिसरात चित्रकूट मैदानावर चित्रपटाच्या सेटला आग

WhatsApp Group

Andheri Fire : मुंबईच्या अंधेरी पश्चिम (Andheri Fire) भागातील चित्रकुट मैदानामध्ये तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या चित्रपटाच्या सेटवरील सामानाला आग लागली आहे. घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळावर रवाना झाल्या आहेत. सिनेमाच्या सेटमधील बहुतांश सामान ज्वलनशील असल्यामुळे आग वेगानं पसरली आहे.

आगीची दृश्ये व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडिओतील दृश्य अतिशय भयावह असल्याचे पाहायला मिळते.

चित्रकूट मैदानावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु असते. या मैदानावर चित्रपटाचे चित्रीकरण ही एक नियमीत बाब आहे. परिसरातील नागरिकांनाही त्याची सवय झाली आहे. चित्रिकरणादरम्यान अनेकदा कृत्रिम आग लावली जाते. तो चित्रिकरणाचा भाग असतो. त्यामुळे नागरिकही त्याकडे त्याच दृष्टीकोनातून पाहतात. मात्र, आज मैदनावर लागलेली आग कृत्रिम नव्हती. खरोखरच होती. नागरिकांना याची कल्पना यायला काहीसा अवधी लागला. सेटवरील लोकांना याची लगेचच कल्पना आली. त्यामुळे त्यांनी अग्निशमन दल आणि महापालिकेला या घटनेची माहिती दिली.