गुगलचे सीईओ ‘पद्मभूषण’ सुंदर पिचाई यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी दाखल केला गुन्हा

WhatsApp Group

मुंबई – गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यावर कॉपीराइट उल्लंघनाचा आरोप आहे. त्यानंतर बुधवारी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी सुंदर पिचाई यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे Fir Against Google Ceo Sundar Pichai.

सुंदर पिचाई यांच्याशिवाय गुगलच्या इतर पाच अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या वतीने न्यायालयाच्या निर्देशानुसार गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि कंपनीच्या अन्य पाच अधिकाऱ्यांविरुद्ध कॉपीराइट उल्लंघनाचा Copyright Act violation गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गुगलने एका अनधिकृत व्यक्तीला ‘एक हसीना थी एक दीवाना था’ ‘Ek Haseena Thi Ek Deewana Tha’ चित्रपट यूट्यूबवर अपलोड करण्याची परवानगी दिल्याचा आरोप चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी केला होता. आता याप्रकरणी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.