प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मुलांच्या आक्षेपार्ह चित्रीकरणाचा आरोप

WhatsApp Group

मुंबई – ‘नाय वरन भात लोन्चा, कोण नाय कोणचा’ या चित्रपटात लहान मुलांच्या आक्षेपार्ह चित्रीकरणाबद्दल दिग्दर्शक महेश मांजरेकर हे अडचणीत सापडले आहेत. पोक्सो न्यायालयाच्या आदेशानुसार, माहीम पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून महेश मांजरेकर यांच्यासह निर्माते नरेंद्र हिरावत, श्रेयस हिरवत, सहनिर्माते विजय शिंदे यांच्यावर पोक्सो, माहिती तंत्रज्ञान तसेच इतर कायद्यांन्वये बुधवारी गुन्हा दाखल केला.

भारतीय स्त्री शक्ती संस्थेच्या मुंबई अध्यक्ष सीमा देशपांडे यांनी ॲड. प्रकाश सालसिंगीकर यांच्यामार्फत कारवाईसाठी न्यायालयामध्ये धाव घेतली होती.