5 रुपयांसाठी सिंधुदुर्ग किल्ल्यावर महिलांचा धिंगाणा, स्थानिक महिलांना चोपलं

WhatsApp Group

Sindhudurg News: सिंधुदुर्ग किल्यावर महिला पर्यटकांची दादागिरी पाहायला मिळत आहे. 5 रुपये कर भरणार नाही, असं सांगत 40 महिला पर्यटकांनी दोन महिला कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. यावेळी काही महिलांनी दोन महिला कर्मचाऱ्यांना धमकी देत मारामारी केली. त्यानंतर किल्याच्या ठिकाणी मोठा राडा पाहायला मिळाला. त्यांनंतर स्थानिक महिलांनी पर्यटनाला आलेल्या महिलांकडून चांगलाच चोप देण्यात आला.

वायरी भुतनाथ ग्रामपंचायच्या माध्यमातून पर्यटन कर वसुली घेण्याच्या विषयावरुन हा वाद झाला. कर भरणार नाही असं सांगत पर्यटक महिलांनी दोन कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत आणि मारहाण केली.

यानंतर हा वाद मालवण पोलिस स्थानकात पोहोचला. स्थानकात पर्यटक महिलांनी स्थानिक महिलांची माफी मागितली त्यानंतर या वादावर पडदा पडला. .