भारताचा पुन्हा पराभव, न्यूझीलंडचा ‘विराट’सेनेवर ८ गडी राखून विजय!

WhatsApp Group

दुबई – टी-२० विश्वचषक 2021 च्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात आज भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघ 20 ओव्हर्समध्ये फक्त 110 धावा करू शकली. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाने 8 विकेट राखून मोठा विजय मिळवला


दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या  या सामन्याकडे सर्व भारतीय चाहत्यांचे लक्ष होतं. कारण विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावाच लागणार होता. मात्र आता भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठणं कठीण होणार आहे.

या दोन्ही दिग्गज संघाला पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. जिथे पाकिस्तानने भारताचा दहा गडी राखून एकतर्फी पराभव केला तर न्यूझीलंडवर 5 विकेट्स राखून विजय मिळवला. भारत सध्या गट-2 च्या गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे, तर न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या स्थानी  पोहोचला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांनी आतापर्यंत एकमेकांविरुद्ध 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान दोन्ही संघांनी 8-8 सामने जिंकले आहेत. टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताने न्यूझीलंडविरुद्ध दोन सामने खेळले असून, दोन्ही सामन्यांमध्ये भारताला पराभव मिळाला आहे.


2003 च्या विश्वचषकापासून भारताला आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडला हरवता आलेले नाही. या वर्षी झालेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दोन्ही संघ शेवटच्या वेळी भिडले होते. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा आठ विकेट्सने पराभव करत WTC चे विजेतेपद पटकावले होते.

आज होणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघाची धुरा विराट कोहलीच्या खांद्यावर असेल, तर केन विल्यमसन न्यूझीलंड संघाची कमान सांभाळेल.