फुटबॉल वर्ल्डकपमधून FIFA ने केली रशियाची हकालपट्टी!

WhatsApp Group

FIFA ने रशियाला सर्व फुटबॉल वर्ल्डकपसह सर्व आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमधून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे FIFA suspends Russia . पोलंड, स्वीडनसारख्या देशांनी रशियाविरुद्ध फुटबॉल सामने खेळण्यास नकार दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. UEFA (युरोपियन फुटबॉल प्रशासकीय संस्था) सोबत प्रदीर्घ चर्चेनंतर फिफाने सोमवारी हा निर्णय जाहीर केला.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी शेजारच्या युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जगभरातून रशियाचा विरोध होत आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC), आधीच आरओसीला त्याच्या ध्वजाखाली स्पर्धा खेळण्यास बंदी घातली आहे.


FIFA आणि UEFA ने सोमवारी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे, “FIFA आणि UEFA ने आज निर्णय घेतला की सर्व रशियन संघांना, मग ते राष्ट्रीय संघ असो किंवा क्लब संघ, त्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत FIFA आणि UEFA या दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकत नाही. फिफा कौन्सिलच्या ब्युरो आणि UEFA च्या कार्यकारी समितीने आज हे निर्णय घेतले आहेत.

चॅम्पियन्स लीगच्या स्पर्धेचा अंतिम सामन्याचे ठिकाणही रशिया आणि युक्रेन युद्धामुळे Russia-Ukraine War बदलण्यात आले आहे. या पूर्वी या स्पर्धेचा अंतिम सामना रशियात होणार होता. मात्र आता हा सामना पॅरिस येथे होणार आहे.