जगातील सर्वात मोठी फुटबॉल संघटना म्हणजेच FIFA ने मंगळवारी अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (All India Football Federation ) बाबत एक घोषणा केली. फिफाने एआयएफएफला तत्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे ( FIFA suspends AIFF ). फिफा कौन्सिलच्या ब्युरोने एकमताने हा निर्णय घेतला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, हे फिफाच्या कायद्याचे उल्लंघन असल्याचे फिफाकडून सांगण्यात आले आहे.
जागतिक फुटबॉल संघटनेने (FIFA) आपल्या निवेदनात म्हटले आहे की, FIFA कौन्सिलच्या ब्युरोने एकमताने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला “अनावश्यक हस्तक्षेप” साठी तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. फिफाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वीमे महिन्यात सुप्रीम कोर्टाने भारतीय फुटबॉल महासंघ बरखास्त केला होता.
Long live corruption @FIFAcom 👏🏻 pic.twitter.com/jtlAPe0IFP
— Blue Pilgrims 🇮🇳 (@BluePilgrims) August 15, 2022
FIFA निवेदनात म्हटले आहे की निलंबनाचा अर्थ असा आहे की 11 ते 30 ऑक्टोबर 2022 दरम्यान भारतात होणारा FIFA U-17 महिला विश्वचषक 2022 देखील होणार नाही. भारतीय क्रीडा मंत्रालयाच्या संपर्कात असून या प्रकरणात सकारात्मक परिणाम मिळू शकेल अशी आशा फिफाने व्यक्त केली आहे. जागतिक फुटबॉल संघटनेच्या नियमांनुसार, सदस्य असणाऱ्या देशातील संस्थांमध्ये कायदेशीर आणि राजकीय मध्यस्थी होता कामा नये. तसं झाल्यास FIFA त्या देशावर कडक कारवाई करते.
