वाचा, समलिंगी मुलींच्या अनोख्या ‘करार’वाल्या लव्ह स्टोरीबद्दल…

WhatsApp Group

नागपूरची त्रिशा आणि गोंदियाची दीपाली या समलिंगी जोडीचा राईट टू लव्ह च्या वतीने पुण्यात मागच्या वर्षी लिव्ह इन रिलेशनशिप चा करार करून देण्यात आला होता. अशा प्रकारचा करार होण्याची हि महाराष्ट्रातील पहिलीच घटना होती. या करारामुळे दोघींना एकत्र राहण्यासाठी कायद्याचा आधार मिळाला होता.

आज दोघींच्याही सहजीवनाला बरोबर एक वर्ष पूर्ण झाले. सध्या नागपूर या ठिकाणी दोघी एकत्र आनंदाने राहत आहेत. त्रिशा नागपूरमध्येच जॉब करत असून त्रिशा अभ्यास करून घर सांभाळत आहे. आपली ओळख न लपवता त्या दोघी बिनधास्तपणे एकमेकांना सोबत देत सुखाने राहत आहेत.

दोघी सज्ञान असून दोघींचं एकमेकींवर जीवापाड प्रेम. त्यांच्या प्रेमाला दोन्ही घरच्यांचा विरोध होता. हे प्रकरण त्यावेळी पोलिस स्टेशनला गेलं होतं. पोलिसांनी दीपालीला घरच्यांबरोबर जाण्याचा सल्ला दिला परंतु राईट टू लव्ह च्या कार्यकर्त्यांनी कायद्याचा आधार घेऊन पोलिसांना पटवून दिले कि त्यांना एकत्र राहण्याचा अधिकार आहे. पोलिसांनी दोघींना सुरक्षितपणे एकत्र राहण्यासाठी सहकार्य केलं.

त्रिशा आणि दीपालीला भविष्यात कुणी धमकी अगर कुणाचा दबाव टाकला तर त्यांना या कराराद्वारे त्यांना कायदेशीर संरक्षण मिळणार आहे. संबंधित जोडी याद्वारे न्यायालयात संरक्षण देखील मागू शकणार आहेत.

दीपाली आणि त्रिशाच्या नात्याला एक वर्ष होण्याच्या निमित्ताने राईट टू लव्ह चे के. अभिजीत यांनी ‘केवळ लैंगिकतेचा नाही तर, समांतर मन भावनेचा प्रवास लेसबॅटिक होवो, अशा आशयाच्या दोघीनांही शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रेम करण्याचा अधिकार सर्व मानवजातीला आहे. कुणाच्या प्रेमाला जात, धर्म, वर्ग, लिंगावरून विरोध होत असेल, जोडीदार निवडीच्या अधिकारासाठी कधीही मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत असे के. अभिजीत यांनी सांगितले.

राईट टू लव्ह गेल्या सात वर्षांपासून जात, धर्म, लिंग, आणि गरीब श्रीमंतीच्या भिंती तोडणाऱ्या जोडप्यांच्या प्रेमाला पाठिंबा देत आहे. अशा जोडप्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम अविरतपणे करत आहे. के. अभिजीत – संयोजक ( राईट टू लव्ह)