दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी राज्य मंडळाकडून शुल्कवाढ, किती रक्कम भरावी लागणार?

WhatsApp Group

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा फी वाढवण्यात आलीय. तब्बल 12 टक्क्यांनी परीक्षा फी वाढवण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला. कागद महागल्यामुळे यंदापासून दहावी आणि बारावीच्या परीक्षांची फी वाढवण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी 50 रुपये जास्त मोजावे लागतील.

समोर आलेल्या माहितीनुसार, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदापासून इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा फीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. परीक्षा फीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 12 टक्ंक्यानी वाढ करण्यात आलीय. दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणत वाढत असल्यामुळे कागदाच्या किमतीतही वाढ होत आहे. त्यामुळे परीक्षा फीमध्ये वाढ करण्यात आल्याचं शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली.