
Roger Federer Emotional Farewell: रॉजर फेडररने अखेर टेनिस कोर्टला निरोप दिला आहे. शुक्रवारी लेव्हर कपमध्ये त्याचा जोडीदार राफेल नदालसोबत दुहेरीच्या सामन्यात पराभव झाला आणि यासह त्याची चमकदार कारकीर्दही संपुष्टात आली. या शेवटच्या सामन्यानंतर रॉजर फेडररला आपले अश्रू आवरता आले नाहीत. तो ढसाढसा रडताना दिसला. या भावनिक क्षणात राफेल नदालही त्याच्यासोबत अश्रू ढाळताना दिसला.
रॉजर फेडरर हा तिसरा सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा पुरुष टेनिसपटू आहे. गेल्या आठवड्यात त्याने टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली. दुखापतीमुळे तो बराच वेळ टेनिस कोर्टच्या बाहेर फिरत होता. अशा स्थितीत त्याने लेव्हर कपमध्ये कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळण्याची घोषणा केली होती.
How are we getting over this? @rogerfederer | @RafaelNadal | #RForever pic.twitter.com/cpOfSznp4X
— ATP Tour (@atptour) September 24, 2022
लेव्हर कपमध्ये तो टीम युरोपसाठी मैदानात उतरला होता. त्याचा जोडीदार स्पॅनिश दिग्गज राफेल नदाल होता. या जोडीने टीम वर्ल्ड जोडी फ्रान्सिस टिफॉय-जॅक सॉकचा पहिल्या सेटमध्ये पराभव केला पण पुढचे दोन सेट गमावले. यासह फेडरर-नदाल जोडीच्या हातून सामनाही निसटला. पराभवानंतर फेडरर कोर्टवरच रडायला लागला.