10 वीत कमी गुण पडतील या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या, मिळाले 81%

WhatsApp Group

सोलापूर – दहावीच्या परीक्षेमध्ये कमी गुण मिळतील या भीतीने माढा तालुक्यात घोटी येथे एका विद्यार्थिनीने शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, जाहीर झालेल्या निकालात तिला 81% टक्के मिळवून उत्तीर्ण झाल्याची माहिती पुढे आली असून, तिच्या आत्महत्येमुळे घोटीत हळहळ व्यक्त होत आहे. अमृता दाजीराम लोंढे (वय १७) असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून, १७ जून २०२२ रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली.

गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास ती कोणालाही काही न सांगता ती घरातून बाहेर पडली. घरात ती दिसत नसल्याने नातेवाइकांनी शोधाशोध सुरू केली; परंतु तिचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घरापासून दोन किलोमीटर अंतरावर शिवराम मोहन लोंढे यांच्या शेतातील शेततळ्यामध्ये पाण्यावर तिचा मृतदेह तरंगताना निदर्शनास आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची टेंभुर्णी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.