जळगाव – अंधारात रस्त्यावर बैलगाडी दिसली नाही. त्यामुळे दुचाकी थेट बैलगाडीवर धडकून झालेल्या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील बाप व लेकीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले आहे. धरणगाव तालुक्यामधील रोटवद गावाजवळ सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
प्रभाकर रघुनाथ सूर्यवंशी ( वय ३५ वर्ष, रा. पिंपळगाव ता. शिंदखेडा, जि. धुळे) तसेच त्यांची मुलगी नायरा प्रभाकर सूर्यवंशी (वय वर्ष ७) हे बाप-लेक जागीच ठार झाले आहेत. तर पत्नी ममता रघुनाथ सूर्यवंशी व मुलगा मोहित प्रभाकर सूर्यवंशी हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच धरणगावचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्यासह कर्मचारी सहाय्यक पोलीस निरिक्षक जितेंद्र पाटील, पोलीस नाईक दिपक पाटील, विनोद संदानशिव, विजय धनगर यांनी घटनास्थळी दाखल झाले. व जखमींना धरणगाव ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल केले.