काढा पिताय तर सावधान…! साताऱ्यात काढयानं घेतला बाप-लेकाचा जीव

0
WhatsApp Group

सातारा जिल्ह्यातील फलटण शहरामधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे रात्रीचे जेवण झाल्यावर मुलांनी वडिलांसोबत आयुर्वेदिक औषध घेतल. मात्र यानंतर तिघांनाही त्रास होऊ लागला. दोघांनाही नंतर जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यात पिता-पुत्राचा वेदनादायक मृत्यू झाला. मुलीला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. ही घटना शनिवारी रात्रीच्या दरम्यान घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, हनुमंतराव पोतेकर, त्यांची पत्नी, मुलगा अमित आणि मुलगी श्रद्धा या चौघांनी शनिवार 8 जुलै 2023 रोजी रात्री एकत्र जेवण केले त्यानंतर तिघही आयुर्वेदिक काढा प्यायले. काढा पिऊन सर्वजण झोपी गेले. मध्यरात्री त्या तिघांनाही त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना सकाळी पोतेकर बाप-लेकाचा 15 मिनिटांच्या अंतराने मृत्यू झाला. पण मुलगी श्रद्धा पोतेकर हिला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.