सिक्कीममध्ये भीषण रस्ता अपघात; लष्कराचे 16 जवान शहीद, 4 जखमी

WhatsApp Group

सिक्कीममधून एक दुःखद घटना समोर आली आहे. जिथे दाट धुक्यामुळे लष्कराच्या वाहनाला अपघात झाला. या वेदनादायक अपघातात लष्कराचे 16 जवान शहीद झाले असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. बर्फाच्छादित रस्त्यावर कार वळवत असताना हा अपघात झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रक चट्टणहून थंगूला लष्कराच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या तीन ट्रकपैकी एक होता. झुमा येथे वळण घेत असताना ट्रक घसरला आणि खोल दरीत पडला. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. चार जखमी जवानांना हेलिकॉप्टरमधून रुग्णालयात नेण्यात आले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला शोक 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अपघातातील लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. राजनाथ सिंह करत म्हणाले, उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या एका रस्ते अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांच्या मृत्यूमुळे मला खूप दुःख झाले आहे. त्यांच्या सेवेबद्दल आणि वचनबद्धतेबद्दल देश मनापासून कृतज्ञ आहे. जे जखमी झाले आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा