उत्तर प्रदेशातील अयोध्येत शुक्रवारी (21 एप्रिल) रात्री एक भीषण रस्ता अपघात झाला. येथील बुथ क्रमांक 4 वर ट्रक आणि बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा दंडाधिकारी नितीश कुमार यांनी दिली आहे. बसमध्ये एकूण 45 प्रवासी होते, त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला, तर 20 प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जेसीबीद्वारे बस रस्त्याच्या कडेला नेली. अपघातस्थळी अजूनही मदत आणि बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी डझनहून अधिक रुग्णवाहिका हजर असून, त्याद्वारे अपघातातील जखमींना रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात नेण्याचे काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ट्रकने बसला धडक दिली तो ओव्हरलोड होता आणि त्यात भिंतीवरील पुटीच्या पिशव्या भरल्या होत्या.
मुख्यमंत्री योगी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला
जिल्हा दंडाधिकारी नितीश कुमार यांनी सांगितले की, या अपघातात आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या आणखी वाढू शकते. सीएम योगी आदित्यनाथ यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे, सीएमओने ट्विट करून ही माहिती दिली आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर सर्व उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
#UPCM @myogiadityanath ने जनपद अयोध्या में सड़क हादसे में हुई जनहानि पर गहरा दुःख प्रकट किया है। मुख्यमंत्री जी ने दिवंगत आत्मा की शांति की कामना करते हुए शोक संतप्त परिजनों के प्रति संवेदना व्यक्त की है।
मुख्यमंत्री जी ने घायलों को तत्काल अस्पताल पहुंचाकर जिला प्रशासन के…
— CM Office, GoUP (@CMOfficeUP) April 21, 2023
याआधी शुक्रवारीच यूपीच्या चंदौलीमध्ये एक रस्ता अपघात झाला होता. भरधाव वेगाने जाणारी कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. या अपघातात 3 जण ठार तर जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.