आसाममध्ये भीषण रस्ता अपघात, 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू

0
WhatsApp Group

Assam Road Accident: आसाममधील गुवाहाटी येथून हृदयद्रावक रस्ता अपघाताची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुवाहाटीतील जलकुबारी भागात रविवारी (28 मे) रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. या रस्ता अपघातात मोठ्या संख्येने लोक जखमीही झाले आहेत, ज्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रस्ता अपघाताबाबत माहिती देताना गुवाहाटीचे सह पोलीस आयुक्त विजय कुमार म्हणाले की, प्राथमिक तपासाच्या आधारे असे आढळून आले आहे की अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व विद्यार्थी आहेत. जळुकबारी परिसरात हा अपघात झाला. हा अपघात कसा झाला, कोणासोबत घडला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मृत विद्यार्थ्यांची नावे

अरिंदम भवाळ आणि निओर डेका (रहिवासी- गुवाहाटी)
कौशिक मोहन (रा. शिवसागर)
उपांगशु सरमाह (रा. नागाव)
राज किरण भुईया (रा. माजुली)
इमोन बरुआ (रा. दिब्रुगड)
कौशिक बरुआ (रा.- मंगलडोई)

या अपघातात मृण्मय बोरा, अर्णव चक्रवर्ती आणि अर्पण भुईया हे तीन विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्याचवेळी अपघातग्रस्त डीआय पिकअप व्हॅनचा चालक आणि क्लिनरची प्रकृती चिंताजनक आहे.