
अमेरिकेमधून एक मोठं वृत्त समोर आलं आहे. न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी (Salman Rushdie) यांच्यावर एका अनोळखी व्यक्तीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी ते पश्चिम न्यूयॉर्कमध्ये व्याख्यान देणार असताना त्यांच्यावर मागून कोणीतरी हल्ला केला. चाकूने वार करून त्यांना जखमी करण्यात आलं आहे. न्यूयॉर्कमधील बफेलोजवळील चौटौका येथे व्याख्यानापूर्वी स्टेजवर रश्दी यांच्यावर चाकूने वार करण्यात आले असून त्यात ते जखमी झाले आहेट.
भारतात जन्मलेले सलमान रश्दी हे त्यांच्या लेखनासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. 1980 च्या दशकात इराणकडून त्यांना त्यांच्या लिखाणासाठी जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. रश्दी यांच्या ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकावर 1988 पासून इराणमध्ये बंदी आहे. दिवंगत इराणचे नेते अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांनी रश्दी यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणारा फतवा जारी केला होता.
Author Salman Rushdie attacked on stage in New York State
Read @ANI Story | https://t.co/per6QZSv5W#SalmanRushdie #NewYork pic.twitter.com/BfkKJrU8KP
— ANI Digital (@ani_digital) August 12, 2022
सलमान रश्दी हे एक जागतिक किर्तीचे लेखक असून बुकर पुरस्काराने त्यांना सन्मानित देखील करण्यात आलं आहे. दरम्यान त्यांनी लिहिलेल्या द सॅटेनिक व्हर्सेस या पुस्तकामुळे मोठ्या प्रमाणात वाद झाले होते. 1980 च्या दशकात सलमान यांच्यावर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमुळे वाद ओढावला होता. खासकरुन मुस्लिम समाजात त्यांच्या या पुस्तकामुळे वाद निर्माण झाला होता.