भीषण अपघात; स्कूल बस आणि कारची धडक, 6 जणांचा मृत्यू

0
WhatsApp Group

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवर भीषण अपघात झाला आहे. क्रॉसिंग रिपब्लिक पोलीस स्टेशन हद्दीतील राहुल विहार समोर स्कूल बस आणि कार यांच्यात भीषण टक्कर झाली. या अपघातात कारचे पूर्ण नुकसान झाले असून त्यातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अपघाताच कारण समजू शकल नाहीय.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी शाळेची बस चुकीच्या दिशेने येत असताना कारला धडकली. शाळेत एकही शाळकरी मुलगा नव्हता. त्यात फक्त चालक होता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गाझियाबाद जिल्ह्यातील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मृत झालेल्या सर्वांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी कामना करत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.

मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना योग्य उपचारासाठी रुग्णालयात नेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

याआधी काल रात्री यूपीच्या प्रतापगडमध्येही अपघात झाला आहे. येथे टेम्पो आणि टँकर यांच्यात झालेल्या धडकेत 12 जणांचा मृत्यू झाला, तर अपघातात 5 जण जखमी झाले.