समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; अपघातानंतर कार जळून खाक, दोघांचा मृत्यू

0
WhatsApp Group

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघात थांबण्याचे नाव नाही. येथे पुन्हा एकदा भीषण अपघातात दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना समृद्धी बुलढाणा मार्गावर देऊळगाव कोळ गावाजवळ घडली. बुलढाण्याजवळील देऊळगाव कोळ गावाजवळ चेनेज 305 जवळ मुंबई कॉरिडॉरवर हा अपघात झाला.

अपघातग्रस्त कार नागपूरहून मुंबईच्या दिशेने जात होती. महामार्गावरून जात असताना अचानक कारने पेट घेतला. या आगीमध्ये दोघांचा मृत्यू झाला. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कार गतिरोधकाला धडकल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचा – IPL 2023 Final: राखीव दिवशीही सामना रद्द झाला तर कोणाला मिळणार ट्रॉफी?