समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. समृद्धी एक्स्प्रेस वेवर प्रवाशांनी भरलेली बस एका कंटेनरला धडकल्याचं वृत्त आहे. या अपघातात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील समृद्धी एक्स्प्रेस वेवर बसची कंटेनरला धडक बसली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झालेल्या खासगी बसमध्ये 35 प्रवासी होते.
समृद्धी द्रुतगती मार्गावर वैजापूर परिसरात अपघात झाला
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील समृद्धी एक्स्प्रेस वेवर रविवारी पहाटे वेगात येणाऱ्या मिनी बसने कंटेनरला धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जिल्ह्यातील एक्स्प्रेस वेच्या वैजापूर परिसरात सकाळी 12.30 च्या सुमारास हा अपघात झाला. हे ठिकाण मुंबईपासून 350 किलोमीटर अंतरावर आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, त्यामुळे बसने कंटेनरला मागून धडक दिली.
हेही वाचा – रोहित शर्माने केला मोठा विक्रम, ख्रिस गेल आणि शाहिद आफ्रिदी पाहतच राहिले
या अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतांमध्ये 5 पुरुष, 6 महिला आणि 1 अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. अधिका-याने सांगितले की, इतर 23 प्रवासी जखमी झाले असून त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रवासी मंदिरात दर्शनासाठी गेले होते
अपघातातील जखमी हे मंदिरात दर्शनासाठी गेले होते, असे सांगण्यात येत आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये चार महिन्यांच्या मुलाचाही समावेश आहे. 23 जखमींवर वैजापूर व संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. वैजापूरजवळील समृद्धी महामार्गावरील जांबर गाव टोल नाक्यावर हा अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या ट्रॅव्हल्स बसने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला. सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी आणि इंदिरानगर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.