
मुंबई -गोवा महामार्गावर पोलादपूरनजीक कशेडी घाट रस्त्यावर चोळई गाव हद्दीमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात रिक्षा चालकासह तीन मुली जागीच ठार झाल्या आहेत. या तिन्ही मुली परीक्षा देऊन घरी परतत होत्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार सोमवारी संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या दरम्यान पोलादपूर काशेडी घाटामध्ये हा अपघात झाला. वाळूने भरलेला डंपर पलटी झाला. त्या खाली एक रिक्षा दबली गेली. या रिक्षामध्ये चालक आणि तीन विद्यार्थीनी होत्या. रिक्षावर डंपरमधली संपूर्ण वाळू पडल्यामुळे चौघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतून काही काळ ठप्प झाली होती.