माळशेज घाटात एसटी- ट्रकचा भीषण अपघात, 20 प्रवासी गंभीर

0
WhatsApp Group

शुक्रवारी रात्री कल्याणहून शिरोलीकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला अपघात झाला. कल्याण नगर महामार्गावरील माळशेज घाटात भरधाव वेगात आलेल्या ट्रकने बसला समोरून धडक दिली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अपघातात 15 ते 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बसमधील जखमी प्रवाशांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस कल्याणहून शिरोलीच्या दिशेने जात होती. या बसमध्ये 20 ते 25 प्रवासी होते. रात्री अकराच्या सुमारास ही बस कल्याण नगर महामार्गावरील खुबीजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली.